शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे नेतृत्व जयश्रीतार्इंकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 23:45 IST

सांगली : पतंगराव कदम, मदनभाऊ पाटील यांची उणीव भासणार असली तरी, कॉँगेस पक्ष महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहे. जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकसंधपणे

ठळक मुद्देविश्वजित कदम : १५ एप्रिलनंतर प्रभागनिहाय बैठका; कार्यकर्त्यांनी कामाला लागावे

सांगली : पतंगराव कदम, मदनभाऊ पाटील यांची उणीव भासणार असली तरी, कॉँगेस पक्ष महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहे. जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकसंधपणे या निवडणुकीला सामोरे जाऊया. कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आदेश युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी दिले. १५ एप्रिलनंतर प्रभागनिहाय बैठका घेऊन इच्छुकांची चाचपणी सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिका निवडणुकीसाठी बुधवारी पुणे येथे विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत कॉँग्रेस नेत्यांची बैठक झाली. यावेळी महापौर हारुण शिकलगार, गटनेते किशोर जामदार, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, नगरसेवक राजेश नाईक, संतोष पाटील आदी उपस्थित होते.महापालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रभाग रचना व आरक्षण सोडतीची माहिती कदम यांनी घेतली. राजकीय आढावाही यावेळी घेण्यात आला.

कदम म्हणाले की, या निवडणुकीत पतंगराव कदम व मदनभाऊ पाटील यांची उणीव पक्षाला मोठ्याप्रमाणात भासणार आहे. तरीही कॉँग्रेस पक्ष निवडणूक पूर्ण ताकदीने लढेल. पक्षाच्यावतीने उमेदवारांना ताकद देण्यात येईल. गेल्या पाच वर्षांतील विकासकामांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जाऊ. जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होणार आहे; मात्र सर्वच कॉँग्रेसचे स्थानिक व प्रदेशचे नेते निवडणुकीत सक्रिय असतील.

१५ एप्रिलनंतर मी स्वत:, जयश्रीताई पाटील, माजी खासदार प्रतीक पाटील, महापौर व पक्षाचे अध्यक्ष, आजी-माजी नगरसेवक प्रभागनिहाय बैठका घेऊन इच्छुकांची चाचपणी करणार आहोत. दोन टप्प्यात आपण प्रभागनिहाय बैठका घेणार आहोत.पोटनिवडणुकीचीही तयारीपतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात मे महिन्यात पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगानेही या बैठकीत चर्चा झाली. महापालिका निवडणुकीसाठी एप्रिलच्या १५ तारखेनंतर प्रभागनिहाय बैठका घेतल्यानंतर लगेचच आपण पलूस-कडेगावमध्ये वेळ देणार आहोत. पण पोटनिवडणुकीमुळे महापालिका निवडणुकीकडे दुर्लक्ष करणार नसल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. 

पक्षाची कोअर कमिटी सर्व निर्णय घेणारकॉँग्रेसच्या परंपरेप्रमाणे महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेणे, त्यांची नावे निश्चित करणे या प्रक्रियेसाठी कोअर कमिटी नेमण्यात येणार आहे. यात पक्षाचे अध्यक्ष, पक्षनिरीक्षक, महापौर, केंद्रीय समिती सदस्य, प्रदेश सदस्य, माजी खासदार आदींचा समावेश आहे.